भगवान श्री कृष्ण चरित्र - मी अनुभवलेल, माझ्या नजरेतून..
कृष्ण ज्याचं नाव गोकुळ ज्याचं धाम अशा श्री भगवान कृष्णाला माझा शतशः प्रणाम.🙏🙏
लहानपणा पासून आपल्या सर्वांना कृष्णाचं आकर्षण आहे, असा कोणी नसेल या भारतात ज्याला कृष्णाचा मोह नाही.
श्री कृष्णासारखा सर्वगुणसंपन्न अद्वितीय पुरुष हिंदुस्थानातच काय पण कोणत्याही देशात आज पर्यंत झाला नाही. अलौकिक पराक्रम, अप्रतिम बुद्धिमत्ता असामान्य नेतृत्वगुण, सर्व सदगुणांनी श्रीकृष्ण सर्व ऐतिहासिक किंबहुना काल्पनिक व्यक्तींच्याही शिरस्थानीं आहेत.
श्रीकृष्णानें आपल्या भागवत गीतेतील उपदेशने सर्व भारतीय लोकांच्या हृदयांवर असा कायमचा ठसा उमटवला आहे की, तो पुसटून टाकणें शक्य नाहीं. श्रीकृष्णाच्या चरित्राने व उपदेशानें भारतीय इतिहासात जे आपल्याला मिळालं आहे, ते इतर कोणाकडून मिळणे कठीण आहे. ज्यांच्या कानांत भगवद्गीतेच्या श्लोकांचा ज्ञानरस पडला आहे, त्यांस अन्य विचार/वाईट प्रवृत्तींचा ध्वनि मधुर लागणें शक्य नाही.
श्रीकृष्णाचं चरित्र अनेक दृष्टींनी अत्यंत मनोहर व उपयुक्त आहे. ते व्यवहार्यास शहाणपण शिकविणारे आहे,जो विपन्नावस्थेत आहे त्याला धैर्य देणारे आहे, ज्याच्या मध्ये निरुत्साह आहे त्याच्या मध्ये उत्साह उत्पन्न करणारे आहे, मनामध्ये संशय असेल तर निश्वयाच्या पायरीवर नेऊन पोचविणारे आहे, सामान्य जनास प्रेम उत्पन्न करणारे, श्रीमंतास उन्मत्तपणापासून वाचविणारे, गरिबास आधार देणारे, दुष्टास भय उत्पन्न करणारे, व सुष्टास नीतिमत्तेचा रस्ता दाखविणारे चरित्र आहे.
"तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा, परंतु लोभाने नाही, अहंकाराने नाही. वासनेने नाही, मत्सराने नाही तर प्रेम, करुणा, नम्रता आणि भक्तीने." मला श्री कृष्णाच हा विचार खुप भावला , सध्या बघितलं तर ह्या कलियुगात मनुष्यामध्ये खुप लोभ , अहंकार, दुसर्यांच्या मत्सर करणे ह्या भावना बळावल्या आहेत.
आपण सर्वांनी नितीमत्तेने सर्वांना सोबत घेऊन राहिल पाहिजे, आपला धर्म पाळला पाहिजे, चांगले कर्म केले पाहिजे हेच तर श्री भगवान कृष्णाने सांगितले आहे.
पुढचा भाग-2 लवकरच.....
पुढील भागासाठी कमेंट करा.....
Comments
Post a Comment