वेळेसाठी काळाला जिंकतोय मी...
काळ तर आला आहे, वेळ चुकवून चालणार नाही.
'काळ - वेळ' आणि प्रभावी कोण मी का?
माझं रिकामं हात मला माझा काळ दाखवत,
'मन-गट' त्याची ताकद दाखवुन द्यायची आहे, पण मन हे सांगायला विसरत नाही "दाखवतो कुणाला आणि का"
हात आणि मनगट दोन्ही जवळ....
"मनगटातील ताकद आणि हाताची लखीर कोणी हिरावून घेऊ शकत नाही",
स्वप्नातला रस्ता, त्या रस्त्यावर चालताना दुर डोंगररांगामधुन येणार तो सुर्य, त्याचा तो प्रकाश ---- आम्ही राजा हरिश्चंद्राचे कर्म केले तरी स्वप्न विकत मिळत असलेल्या बाजारातील रस्त्यावर चालत असताना सुर्य मात्र डोक्यावर आग ओकत होता ----- मागच्या मुसळधार पावसामुळे त्वचेला पाण्याची सवय होउन गेली, तेव्हाच डोक्यात गेलेल्या हवेमुळे कातड्याला या वादळ-वाऱ्याचा विट आला ---- रोज एक नवा पाहुणा --- असो --- सांगायच होत काय तर या डोक्यावरच्या तळपत्या ज्वाळांनी ह्या काताड्याना आगीची सवय होउन गेली.
मनातील जिद्द, स्वप्नांची चिकाटी हे मला विश्रांती मिळवून देईना, काय तो ध्येयाचा पाठलाग तो करताना श्वास घेईला वेळ मिळत नाही..
एक प्रश्न नेहमी पडतो का करतोय हे सगळं...
उत्तर आलं---
ते तुझं - हो तुझंच स्वप्न नाही का, ज्याने तुला ह्या चक्रव्यूहात टाकलं होतं ते चक्रव्यूह तु पूर्ण करत आला आहेस,... ज्याने तुझ्या आयुष्यात संकटांची मालिका उभारली पण तु ती मालिका पुर्ण करत आलास... ज्या स्वप्नांने तुझ्या पुढे आलेल्या सोन्याच्या घासाला ही हिसकावून दुर नेले - कधी कधी तर तो घास तुला मिळवू दिला नाही.. त्या स्वप्नांनसाठी चालू आहे हे सगळं, ते एक पाऊल दूर आहे तु फक्त एक पाऊल टाकलं की अखंड ब्रह्मांड तुझं होईल..
स्वप्नं ते सत्य हा आपल्या एक काळाचा प्रवास आहे, तिथं वेळ पाहीचा नसतो, कर्म केले की आपला काळ चालू होतो तो नेहमीच वेळेला सोबत आणतो...
कालायः तस्मै नमः
Nice sir💯
ReplyDelete