Skip to main content

जीवनाचा आनंद घ्या - - - Why to wait for a DEATH…

 जीवनाचा आनंद घ्या  - - - Why to wait for a DEATH…


आनंद हा विकत मिळत नाही, आनंद हा स्वभावात असायला हवा. 


आपण नेहमी बघतो की मनुष्य हा आनंदी नसतो, किंवा काही गोष्टी त्याचा आनंद हिरावून घेतात- जस की भूतकाळातील प्रसंग, वर्तमानातील चालू घडामोडी, किंवा भविष्याची चिंता.

मला एक जाणवलं की मनुष्य आनंदी राहण्याचा प्रयत्न कधीच करत नाही काही अपवाद वगळता.. किंवा त्याला ज्या गोष्टी आनंदी ठेवतात तो त्याचा पाठलाग करतो ह्यासाठी की त्या गोष्टी त्याला मिळाल्या पाहिजेत, पण ज्यावेळेस तो भविष्यामध्ये आनंदी , सुखी राहण्याचा प्रयास करतो तो वर्तमानातल्या क्षणाला मुकतो.. आपला आयुष्य जे आपण जगतो , जगलेलो असतो ते एक आपलं वर्तमानच नाही का.

 जर आपल्याला आनंदी/ सुखी  राह्यचं असेल तर आपण वर्तमानकाळात आनंदी राहायचा प्रयत्न केला पाहिजे जरी परिस्थिती कशीही असली तरी.

आनंद हा जीवनभरासाठी हवा असेल तरइतरांना हि आनंदी करा. 

जो आनंद/आधार  इतरांना देतो तो एक दिवस परत आपल्याकडे येतो असा भागवतगीते मध्ये श्री कृष्णाने सांगितलं आहे.

जीवन हे एक सुंदर अनुभव आहे - ते आपल्याला नेहमी देत असत , जीवनातील प्रत्येक क्षणांचा आनंद घेतला पाहिजे,

सध्या लोकांच्या अपेक्षा असतात की समोरील व्यक्तीने आपल्या मनासारखं वागावे, आणि तो व्यक्ती तास वागला नाही तर आपल्याला राग येतो, अपेक्षा ला अंतः नाही, जर प्रेत्यकाने स्वतःला आनंदी ठेवले तर  प्रेत्येक जण आनंदी होईल..

काहीजण कोठेही बँड वाजताना दिसला की, लगेच त्या ठिकाणी जाऊन इतरांसोबत नाचायला लागतात. त्यांना काहीही फरक पडत नाही. कोणाचं लग्न आहे की लोक काय म्हणतील. त्यांना फक्त नाचण्याचा आनंद घ्यायचा असतो. ते सर्वांसोबत दिलखुलास  नाचतात आणि नाचल्यानंतर प्रसन्न होऊन निघूनही जातात. अशी लोकं प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक क्षणी आनंद शोधतात. ज्या ठिकाणी आनंद मिळेल त्या ठिकाणी जावून इतरांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात - त्यांचाही आयुष्यात दुःख असतात पण त्यांनी ती कला मिळवली असते  की दुःख बाजूला सारून आनंद शोधायचा कसा..

मला एक वाटतं आनंदाने जगायचे असेल, तर दोनच गोष्टी विसरा..  तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते, आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केले ते.. कारण आपली विचार प्रक्रिया असते ते बहुतांशी मुख्य भूमिका बजावते..

 

सुखदु:खाच्या लंपडावातच..

जीवनाचा खराखुरा आनंद आहे… 


Part 2- soon 





Comments

Popular posts from this blog

वेळेसाठी काळाला जिंकतोय मी...

वेळेसाठी काळाला जिंकतोय मी...                                                 काळ तर आला आहे, वेळ चुकवून चालणार नाही. 'काळ - वेळ'  आणि  प्रभावी कोण मी का? माझं रिकामं हात मला माझा काळ दाखवत,  'मन-गट' त्याची ताकद दाखवुन द्यायची आहे, पण मन हे सांगायला विसरत नाही "दाखवतो कुणाला आणि का"  हात आणि मनगट दोन्ही जवळ.... "मनगटातील ताकद आणि हाताची लखीर कोणी हिरावून घेऊ शकत नाही",   स्वप्नातला रस्ता, त्या रस्त्यावर चालताना दुर डोंगररांगामधुन येणार तो सुर्य, त्याचा तो प्रकाश ---- आम्ही राजा हरिश्चंद्राचे कर्म केले तरी स्वप्न विकत मिळत असलेल्या बाजारातील रस्त्यावर चालत असताना सुर्य मात्र डोक्यावर आग ओकत होता ----- मागच्या मुसळधार पावसामुळे त्वचेला पाण्याची सवय होउन गेली, तेव्हाच डोक्यात गेलेल्या हवेमुळे कातड्याला या वादळ-वाऱ्याचा विट आला ---- रोज एक नवा पाहुणा --- असो --- सांगायच होत काय तर या डोक्यावरच्या तळपत्या ज्वाळांनी ह्या काताड्याना आगीची स...

FRIENDS OUR LIFELINE

FRIENDS OUR LIFELINE     LKG ला बुटाची लेस बांधायला शिकवल्या पासून ते अगदी आतापर्यंतच्या आणि पुढील आयुष्याच्या पुस्तकाचा धडा जगण्या पर्यंत मी ONKAR KHAMGAL नाव सांगु शकतो ते केवळ मित्रांनो तुमच्या मुळे.                         काही मित्र संकटात उभे राहिले, काहींनी संकटे येवून दिली नाहीत, काही तर माझा वर आलेल्या संकटांना स्वतः ONKAR KHAMGAL म्हणून सामोरे गेले सुद्धा.                            नियतीने माझ्या आयुष्यात टाकलेल्या चक्रव्यूहात काही माझ्या ONKAR KHAMGAL या नावासाठी लढले, जगले तर काही उपाशी सुद्धा राहीले.       तुम्ही जेव्हा तुमचा मित्रता धर्म पाळता तेव्हा मला नेहमी कृष्ण आणि कर्णा ची आठवण आल्याशिवाय राहत नाही .       मी आयुष्याच्या धावपट्टीवर सुसाट वेगाने पुढे जात आहे ह्यामध्ये कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक ह्या सोबत तुम्हा मित्रांचा सहारा आहे, होता व राहील हीच अपेक्षा.  मित्र #friends FRIENDS OUR LIFELIN...