भगवान श्री कृष्ण चरित्र - मी अनुभवलेल, माझ्या नजरेतून.. कृष्ण ज्याचं नाव गोकुळ ज्याचं धाम अशा श्री भगवान कृष्णाला माझा शतशः प्रणाम . 🙏🙏 लहानपणा पासून आपल्या सर्वांना कृष्णाचं आकर्षण आहे, असा कोणी नसेल या भारतात ज्याला कृष्णाचा मोह नाही. श्री कृष्णासारखा सर्वगुणसंपन्न अद्वितीय पुरुष हिंदुस्थानातच काय पण कोणत्याही देशात आज पर्यंत झाला नाही. अलौकिक पराक्रम, अप्रतिम बुद्धिमत्ता असामान्य नेतृत्वगुण, सर्व सदगुणांनी श्रीकृष्ण सर्व ऐतिहासिक किंबहुना काल्पनिक व्यक्तींच्याही शिरस्थानीं आहेत. श्रीकृष्णानें आपल्या भागवत गीतेतील उपदेशने सर्व भारतीय लोकांच्या हृदयांवर असा कायमचा ठसा उमटवला आहे की, तो पुसटून टाकणें शक्य नाहीं. श्रीकृष्णाच्या चरित्राने व उपदेशानें भारतीय इतिहासात जे आपल्याला मिळालं आहे, ते इतर कोणाकडून मिळणे कठीण आहे. ज्यांच्या कानांत भगवद्गीतेच्या श्लोकांचा ज्ञानरस पडला आहे, त्यांस अन्य विचार/वाईट प्रवृत्तींचा ध्वनि मधुर लागणें शक्य नाही . श्रीकृष्णाचं चरित्र अनेक दृष्टींनी अत्यंत मनोहर व उपयुक्त आहे. ते व्यवहार्यास शहाणपण शिकविणारे आहे,जो विपन्नावस्थेत आहे त्याला धैर्य दे...
To Achieve Bright Future